Today Horoscope In Marathi: आजचे राशी भविष्य 30 ऑगस्ट 2024 मराठी मध्ये

आजचे राशी भविष्य 30 ऑगस्ट 2024 (Today Horoscope In Marathi): आजचा दिवस (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस आणि कोणत्या राशीसाठी भाग्यवान क्रमांक व शुभ रंग काय असेल हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.


(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:

( चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त जाणार आहे. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी खास असणार आहे. आज व्यवसायात काही बदल केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. गेल्या काही दिवसांपासून काही कामं पूर्ण न झाल्यामुळे काही अडचण येत असेल, तर तुम्हाला नक्कीच त्यांची चौकशी करावी लागेल. आज तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलांना दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल. एखाद्या विषयावरून तुमचा मित्राशी विनाकारण वाद होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या काही लक्झरीच्या खरेदीवर चांगला पैसा खर्च कराल.

भाग्यवन क्रमांक :- ३
शुभ रंग :- नारंगी

(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:

( इ , ऊ , ए , ओ , वा , वी ,‌ वू , वे , वो ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. व्यापाऱ्यांनी हाती घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतील. तुम्ही कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळावे, अन्यथा तुमच्यावर नंतर टीका होऊ शकते. तुमच्या समस्या कमी होतील त्यामुळे तुमचे मन हलके होईल. कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीसाठी घरापासून दूर जाऊ शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले काम आज पूर्ण होतील. तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेन.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- पिवळा

(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:

( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह )‌‌ आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. आज तुम्हाला काही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहण्याचा आहे. मोठी गुंतवणूक केल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल आणि तुम्हाला डोकेदुखी, थकवा इत्यादी समस्या जाणवू शकतात. तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आज विद्यार्थी त्यांचे काही महत्त्वाचे प्रॅक्टिकल पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. जर तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल काळजीत असाल तर ते देखील मजबूत होईल. कोणत्याही व्यवसाय योजनेबाबत तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी बोलू शकता. आज तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार आणि परंपरा शिकवाल.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- जांभळा

(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:

( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो ) आजचा दिवस तुमच्यासाठी काही संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्तम यश मिळेल. धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखाल. आज तुम्ही धार्मिक कार्यात काही पैसे खर्च करावे. कुटुंबातील काही मतभेदामुळे तुमचे काही विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर तेही आज दूर होतील. आरोग्याचे बाबतीत आज तुम्ही तंदुरुस्त असाल. तुम्हाला कुटुंबातील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमी जोडप्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल.

भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- निळा

(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:

(मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेन. आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना घरातील वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. जर तुम्हाला बर्याच काळापासून कोणतीही समस्या येत असेल तर ती देखील आज दूर होईल. तुम्हाला तुमच्या भावाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगले काम करून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना आश्चर्यचकित कराल, ज्यामुळे तुम्हाला पगारवाढ इत्यादी सारख्या काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर ते तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देईल.

भाग्यवान क्रमांक :- ६
शुभ रंग :- राखाडी

(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:

( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळाल्याने मन प्रसन्न होईल. तुमच्या काही चुकीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, त्यामुळे खूप सावधपणे बोला आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. आज तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या परिवारात आनंद व शांतीचे वातावरण असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कोणाशीही भागीदारी करणे टाळावे लागेल, अन्यथा त्यांचे काही नुकसान होऊ शकते. अनेक काळापासून रखडलेल्या कामात प्रगती होईल. तुम्ही कोणत्याही क्रीडा स्पर्धेत भाग घेतलात तर तुम्ही त्यात जिंकू शकता.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- लाल

(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:

( रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते ) आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेन. आज तुम्ही तुमच्या इच्छाशक्ती आणि तुमच्या भावना सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुम्हाला एखाद्याची मदत घ्यावी लागेल, परंतु तुम्हाला कोणत्याही बाबतीत राग दाखवणे टाळावे लागेल. तुम्ही आज एखाद्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लॉन्ग ड्राईव्हला जाल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुम्हाला जवळ किंवा दूरच्या सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबाबत शिक्षकांशी बोलून घ्याव लागेल.

भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- पांढरा

(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:

( तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू ) आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असणार आहे. आज तुम्ही कोणत्याही विषयावर जास्त विचार करू नका, अन्यथा तुम्ही गोंधळून जाल आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आज एखाद्या खास व्यक्तीला भेटून तुम्हाला बरे वाटेल. जास्त धावपळ केल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल. जर तुम्हाला काही शारीरिक समस्या असतील तर त्यामुळे जास्त वेदना होऊ शकतात. आज तुमच्या आरोग्य चांगले असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावे, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांना दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील.

भाग्यवान क्रमांक :- १
शुभ रंग :- हिरवा

Today Horoscope In Marathi

(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:

( ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे ) आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही तुमचे महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल. तुमच्या व्यवसायाच्या योजना मजबूत होतील आणि कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवण्याआधी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. आज तुम्हाला व्यापारात चांगला प्रतिसाद मिळेल. जर तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या वागणुकीबद्दल काळजी वाटत असेल तर आता तुम्हाला त्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीसाठी बाहेर जाऊ शकतो.

भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- आकाशी

(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:

( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. आज तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आज तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे काही महत्त्वाचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी कळू शकते. प्रेमी जोडप्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण झाल्यावर तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संध्या मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आज केलेल्या प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- हलका पिवळा

(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:

( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. आज तुम्हाला दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या प्रियसीला तिची आवडती वस्तू गिफ्ट म्हणून द्याल. तुमची कोणतीही बाब कायदेशीररित्या वादग्रस्त असेल तर त्यात तुमचा विजय होईल, पण तुम्ही न विचारता कोणालाही सल्ला देणे टाळावे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावातून आराम मिळत असल्याचे दिसते. खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश आणि संधी प्राप्त होईल.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- गुलाबी

(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:

( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. आज तुमचे तंदुरुस्त आणि चांगले राहील. तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते अधिक घट्ट होईल. अडचणीच्या काळात मित्र परिवाराची मदत होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा कोणताही प्रलंबित करार अंतिम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमचा एखादा मित्र तुम्हाला पैशाशी संबंधित काही मदत मागू शकतो, जी तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. आजचा दिवस हा नवीन घर, वाहन, दुकान इत्यादी घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण करणारा दिवस आहे.

भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- लाल

राशी भविष्य २९ ऑगस्ट २०२४ मराठीतून