आजचे राशी भविष्य 29 ऑगस्ट 2024 (Today Horoscope In Marathi): आजचा दिवस (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस आणि कोणत्या राशीसाठी भाग्यवान क्रमांक व शुभ रंग काय असेल हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:
( चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. आज विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल मध्ये वर्ग मित्रांची मदत घ्यावी लागेल, त्यामुळे तुमचे काम सोपे होईल. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल. काही लोक तुमच्या चांगल्या वागण्याने खूप प्रभावित होतील. तुम्हाला काही नवीन लोकांकडून शुभ कार्यात मदत मिळण्याची शक्यता आहे. परस्पर विश्वासाच्या मदतीने तुमचे वैवाहिक नाते अधिक घट्ट होईल. या राशीच्या इलेक्ट्रॉनिक अभियंत्यांसाठी आजचा दिवस खास आहे. कामात यश मिळेल. तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण होईल. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. आज तुमच्या आरोग्य चांगले राहील. मुलांशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- आकाशी
(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:
( इ , ऊ , ए , ओ , वा , वी , वू , वे , वो ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. यावेळी तुम्ही तुमच्या कार्यशैलीत नवीन प्रयोग करू शकता. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे काम यशस्वी होईल. पण थोडी काळजी घ्यावी लागेल. काही अनावश्यक खर्चही होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगले बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आज तुम्ही धर्म किंवा समाजाशी संबंधित काही काम करू शकता. आठवड्याच्या मध्यात अनावश्यक सहली टाळा आणि कुटुंबाची काळजी घ्या. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते.
भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- लाल
(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:
( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश होतील. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज आपण मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करू. या राशीच्या आयआयटी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस छान आहे. तुमच्याबरोबर सर्व काही चांगले होईल. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. आज तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम व्हाल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पार्ट टाइम काम करू शकता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काही महत्त्वाची कार्यालयीन कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर तुमचा दर्जा वाढेल. जीवनात तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल.
भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- तपकिरी
(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:
( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले क्षण घेऊन आला आहे. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा सुरू केले तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. मालमत्तेबाबत न्यायालयात काही प्रकरण असल्यास, ते सामंजस्याने सोडवा. व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांची मदत घ्या. आर्थिक बाबतीत सहज प्रगती होईल. जर तुम्ही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याचे काम करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल.
भाग्यवान क्रमांक :- ६
शुभ रंग :- निळा
(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:
(मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती राहिली. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. आज तुमचे मन सामाजिक कार्यात असेल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी आज तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेम जीवन उत्तम असेल. पालक आपल्या मुलांना मौजमजेसाठी बाहेर घेऊन जातील. यामुळे मुले आनंदी दिसतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. काही नवीन कामाचे नियोजन करू शकाल. आज वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- पिवळा
(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:
( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. नवीन क्षेत्रात तुमचा ठसा उमटवण्यासाठी तुम्ही तयार असाल. उद्योजक चांगले काम करतील. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाल आणि मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. मुले आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतील आणि तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. कुटुंब तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाचे वातावरण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. जे लोक दीर्घकाळ आजाराने त्रस्त आहेत त्यांचा आत्मविश्वास त्यांना आजारावर मात करण्यास मदत करेल आणि आरोग्यामध्ये सुधारणा शक्य आहे. तुम्हाला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बरे वाटेल.
भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- मोरपिसी
(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:
( रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते ) आजचा दिवस तुमच्यासाठी समिश्र जाऊ शकतो. आज तुमच्या आरोग्य उत्तम असेल. आज तुम्हाला कौटुंबिक कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुमचा एक वर्गमित्र तुमच्याशी वैयक्तिक काहीतरी शेअर करेल. तुम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुम्ही शिक्षकांशीही काही विषयावर चर्चा कराल. तथापि, आरोग्याच्या बाबतीत, आपल्या आरोग्यामध्ये काही चढ-उतार असतील. ऑफिसमध्ये काही नवीन काम मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे टाळावे. आज तुम्ही ब्राह्मणाला काहीतरी दान करा, सर्व काही ठीक होईल.
भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- हिरवा
(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:
( तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू ) आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित लोकांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल आणि त्यांना आकर्षक बक्षीसे मिळू शकतात. तुम्ही तुम्ही तुमच्यासाठी कीर्ती आणि वैभव कमवू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कामात आणि व्यवसायात सकारात्मक प्रगती होईल. नोकरी किंवा व्यवसाय बदलायचा असेल तर यश मिळेल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांकडे तुम्ही आकर्षित व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल आणि मुलांना तुमचा अभिमान वाटेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम येऊ शकते.
भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- गुलाबी
(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:
( ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे ) या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना अपेक्षित यश आणि सुखसोयी मिळविण्यासाठी पैसा आणि वेळ या दोन्हींचे व्यवस्थापन करावे लागेल. आठवड्याचा पूर्वार्ध खूप व्यस्त असणार आहे. या काळात तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास थकवणारा ठरेल पण नवीन संपर्क वाढेल. तुमच्या मित्राला आज तुम्ही काहीतरी सांगणार आहात. त्यामुळे तुमचा मित्र आनंदी होणार आहे. शरीराची काळजी घ्या. आणि आनंदी राहा.
भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- गडद पिवळा
(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:
( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. आजचा दिवस दिवसात तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धन खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज प्रेमावर विश्वास ठेवायला शिकाल. त्यामुळे तुमचा अनुभव खूप वेगळा असेल. आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकाल. आज तुम्ही मित्रांकडून पैसे घ्याल. पण तुम्हाला परत द्यायला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही निराशा व्हाल.
भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- तपकिरी
(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:
( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचा काही वाद होत असेल तर तो सोडवला जाऊ शकतो. तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो. आज तुम्ही जे स्वप्न बघता ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुमच्या मना त जिद्द असावी. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या घरी पाहुणे येणार. त्यामुळे तुम्ही आज आनंदी राहा.
भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- हिरवा
(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:
( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते अधिक घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा कोणताही प्रलंबित करार अंतिम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुमच्याकडून पैशाची देवाणघेवाण होईल. आणि आज तुम्हाला मित्र एक चांगला धडा शिकवतिल. या राशीच्या लोकांना आज काही सप्राईज मिळणार आहे.
भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- जांभळा