Today Horoscope In Marathi: आजचे राशी भविष्य 22 सप्टेंबर 2024 मराठी मध्ये

आजचे राशी भविष्य 22 सप्टेंबर 2024 (Today Horoscope In Marathi): आजचा दिवस (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस आणि कोणत्या राशीसाठी भाग्यवान क्रमांक व शुभ रंग काय असेल हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:

( चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही पुढे जाल. आज तुम्हाला कुणाची आठवण येईल, आणि ती व्यक्ती आज तुमच्या घरी येईल. एखाद्या मौल्यवान वस्तू प्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. गोड खाणं जरा बंद करा.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- लाल

(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:

( इ , ऊ , ए , ओ , वा , वी ,‌ वू , वे , वो ) आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील कोणताही अडथळा तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत असेल तर तोही आज दूर होईल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रम आयोजित केल्यास वातावरण प्रसन्न राहील. वेळेचे महत्व ठेवा, नाहीतर तुम्ही अडचणी याल. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील शुल्लक भांडण मिटून जाईल. आणि तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही व्यायाम करा, त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

भाग्यवान क्रमांक :- ६
शुभ रंग :- पांढरा

(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:

( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर आणि समर्पणाने काम करण्याचा दिवस असेल. तुम्ही तुमची दिनचर्या सांभाळता. तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि तुमचा व्यवसाय सुरू होईल. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तो बराच काळ टिकू शकतो. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धूम्रपान करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत थांबणे टाळा.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- चंदनाचा

(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:

( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो ) आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी कराल. तुमच्या मुलांना दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. आजचा दिवस सुरेख जाईल, म्हणून आज तुम्ही तंदूरस राहाल. तुमच्या संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल.

भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- पिवळा

(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope :

(मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी कराल. तुमच्या मुलांना दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळु शकेल आणि तुम्ही कोणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. आज तुम्ही घरच्यांसोबत बाहेर जेवायला जाण्याच्या कार्यक्रम करू शकता.

भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- पिवळा

(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:

( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाच्या कामात गती ठेवण्यासाठी असेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची व्याप्ती आणखी वाढेल. आज तुमचा वाढदिवस असेल, तर तुम्हाला आज खूप मोठा सप्राईज भेटू शकतो. त्यांनी तुमचं दिवस खूप सुंदर जाईल. आज सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून प्रार्थना करा. आज आपल्या आई-वडिलांच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. आज तुमचे स्वास्थ उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

भाग्यवान क्रमांक :- ६
शुभ रंग :- निळा

(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:

( रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते ) आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. जर आज तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल काळजी वाटत असेल तर ती दूर होऊ शकते. आत्मविश्वासाने पुढे जावे लागेल, अन्यथा अडचणी येतील. जोडीदारासोबत आज कुठेतरी बाहेर फिरायला जाल. जर तुम्हाला आज व्यवसायात काही समस्या येत असतील तर त्याही आज दूर केल्या जातील. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम आज पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रेमी जोडप्यांमध्ये आज रोमॅण्टिक वातावरण असेल.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- तपकिरी

(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:

( तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू ) आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. आज व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. आजचा दिवस तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढवणार दिवस आहे आणि तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या वैयक्तिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळेल. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला सल्ला दिला तर तुम्हाला त्यांचा सल्ला पाळणे टाळावे लागेल. आज तुम्ही तुमचे नवीन घर घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना नवीन कामे मिळतील. सासरच्या परिवाराकडून तुम्हाला मान मिळतो असे दिसते. आज व्यवसायातील बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील.

भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- हिरवा

 आजचे राशी भविष्य

(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:

( ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आजचा दिवस हा व्यापाऱ्यांना चांगली संधी निर्माण करून देईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, ज्यापासून तुम्हाला दूर राहावे लागेल. कामाकडे दुर्लक्ष केल्यास आज नुकसान होऊ शकते. मित्रांची चांगली साथ मिळेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळून देईल. तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास कायम मजबूत ठेवा.

भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- निळा

(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:

( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) आजचा तुमचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे. वादविवादाच्या प्रसंगातून आज लांबच रहा. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून पूर्ण मदत मिळेल, परंतु मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्हाला काही समस्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही तणावात राहाल. जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांचा त्यांच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर पार्टी करायला जाऊ शकता.

भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- आकाशी

(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:

( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साहाने भरलेला असणार आहे. आज तुमच्याकडून अनेक प्रकारची चांगले कामे होतील. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि इतरांच्या बोलण्यावर दुर्लक्ष करा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन घर घेण्याचे विचार कराल. आज तुम्हाला उत्पादनाच्या अनेक संधी मिळतील म्हणून त्या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्या. अनेक दिवसापासून असणाऱ्या समस्यावर उपाय मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील, त्यामुळे तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

भाग्यवान क्रमांक :- १
शुभ रंग :- जांभळा

(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:

( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. रखडलेली कामे तुमच्या मित्रांच्या सहकार्याने पूर्ण कराल. तुमच्या कामात काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील. वधू-वरांसोबत तुमची चांगली मैत्री होईल. तुम्हाला काही दीर्घकालीन योजनांचे चांगले फायदे मिळतील. आज तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेनुसार काम मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल, परंतु तुमचे काही विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तरीही तुम्ही तुमच्या चतुर बुद्धिमत्तेने त्याचा पराभव करू शकाल. प्रेमी जोडपे मध्ये आनंदाचे वातावरण असेल.

भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- हिरवा