Today Horoscope In Marathi: आजचे राशी भविष्य 28 सप्टेंबर 2024 मराठी मध्ये

आजचे राशी भविष्य 28 सप्टेंबर 2024 (Today Horoscope In Marathi): आजचा दिवस (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस आणि कोणत्या राशीसाठी भाग्यवान क्रमांक व शुभ रंग काय असेल हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:

( चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) तुमच्या तब्येतीकडे थोडं लक्ष द्या. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.

भाग्यवान क्रमांक :- १
शुभ रंग :- पांढरा

(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:

( इ , ऊ , ए , ओ , वा , वी ,‌ वू , वे , वो ) आज वृषभ राशीचे लोक त्यांच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नात ते यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या पालकांच्या आनंदासाठी काहीतरी योजना करू शकता, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत आनंददायी क्षण घालवाल. कौटुंबिक मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांची आवड खूप वेगळी असते. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. आज पाण्याची आयुष्यात काय किंमत आहे याबाबतीत तुम्ही घरातील लहान लोकांना लेक्चर देऊ शकता.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- राखाडी

(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:

( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) आज मिथुन राशीचे तारीख सांगतात की तुम्ही जे काही काम करायचं निर्णय घ्या ते आज पूर्ण होईल, पण त्यासाठी तुम्हाला थोडी तडजोड करावी लागेल. लोक तुमच्यावर लक्ष ठेवतील आणि काही तुमच्याबद्दल तक्रारही करतील, परंतु तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि कोणी काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. तुमचे विरोधक इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल.

भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- लाल

(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:

( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो ) आज तुम्हाला मानसिक पाळीचा त्रास होऊ शकतो तर तुम्ही तुमची काळजी घ्या.कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आणि आनंददायी असेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. आज कुटुंबात काही भाग्यवान किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते, ज्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सहवास आवश्यक असेल. आज संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळी मध्ये मिसळ आणि यालाच अमल तुमच्या मनावर राहील. आज घरी जाताना काहीतरी गोड घेऊन जा, आज घरच्यांचं तोंड गोड करा.

भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- नारंगी

(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:

(मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आरोग्य कडे लक्ष द्या, शरीरात रक्त कमी होऊ शकते तर तुम्ही चेकअप करून घ्या.सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. कामाच्या दबावामुळे तुम्ही तणावात राहू शकता. बरं, तुमच्या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. तुमच्या मुलांचा आनंद पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुमची धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. आज तुम्हाला लहानपणीची गोष्ट मिळणार आहे तर तुम्ही त्यामुळे खूप खूप खुश व्हाल. आजचा दिवस आपला प्रेमी के सीएससी ला दुखू नका अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल.

भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- हिरवा

(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:

( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस, आहे आज तुम्ही खूप फ्रेश रहाल. कन्या राशीच्या लोकांना आज बुद्धी आणि संयमाने वागावे लागेल. आज तुम्ही तुमच्या घर किंवा व्यवसायासाठी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर आधी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा नंतर समस्या उद्भवू शकतात. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी वादग्रस्त प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते, अशा परिस्थितीत संयमाने आणि संयमाने काम करा. आज तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडू शकता तर सोबत एक गुलाबाचं रोज नक्कीच ठेवा.

भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- गुलाबी

(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:

( रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते ) आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही गरजू लोकांना मदत कराल, ज्यामुळे समाजात तुमची चांगली प्रतिमा सुधारेल. आज तूळ राशीच्या लोकांचे तारे सूचित करतात की तुमच्या कामाच्या वागणुकीबाबत काही वाद असतील तर ते आज सोडवले जाऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीतरी योजना कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तारे सांगतात की आज तुमचे शेजारी तुमच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकतात, परंतु तुम्हाला त्यात पडणे टाळावे लागेल. तुम्ही जोडप्यामध्ये आज एकमेकांच्या भावनांचा आदर करतील, व्यवसायात तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर ते तुम्हाला फायदेही देतील. आज मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल.

भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- मोरपिसी

(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:

( तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू ) आजचा तुमचा दिवस खास असणार आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. परीक्षेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आज वृश्चिक राशीचे नोकरदार लोक कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असतील तर त्याबाबतचे तुमचे नियोजन यशस्वी होऊ शकते. कुटुंबात काही वाद असेल तर आज तुमचे प्रकरण सुटू शकते. विवाहित लोकांसाठी आज चांगले विवाह प्रस्ताव येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एकामागून एक लाभदायक संधी मिळू शकतात. आज तुम्हाला तुमच्या सासऱ्यांकडूनही आदर आणि लाभ मिळत असल्याचे दिसते. विवाहित जोडप्यामध्ये आनंदाचे वातावरण असेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- आकाशी

Today Horoscope In Marathi

(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:

( ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे ) आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज थोड्या मेहनतीने काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसाधारणपणे चांगला जाणार आहे.आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहात.आज स्वतःसाठी नवीन कपडे, किंवा काही छंद वस्तू खरेदी करू शकतो. पण आज तुम्हाला तुमच्याकडून कोणाची तरी गरज आहे.नातेवाईकासाठी काही पैशांची व्यवस्था करावे लागेल. खाजगी नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी आज दिवस त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष देणे आवश्यक आहे, तरच ते यश मिळवू शकतात साध्य करू शकाल.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- पांढरा

(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:

( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) तुमचा आजचा दिवस व्यक्तिमत्त्वाला उंचावण्यासाठी चांगला आहे. या तुमच्या चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करेल. व्यवसायात काही चुकीच्या निर्णयामुळे आज तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायातील मंदीमुळे आज तुम्हाला तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलाच्या विवाहाबाबत काही समस्या निर्माण होत असतील तर आज तुम्ही वरिष्ठ सदस्याच्या मदतीने त्याचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. संध्याकाळी तुमच्या घरी अतिथीचे आगमन होऊ शकते, ज्यामध्ये काही पैसे खर्च करायला देखील समाविष्ट असतील. प्रेमी युवकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. जर होय, तर त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.

भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- हलका निळा

(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:

( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ आज मिळणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आज तारे सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध आणि सतर्क राहावे लागेल कारण त्यात काही बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कोणतेही काम घाईत करू नका, अन्यथा तुमचे काम बिघडू शकते आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारले जावे लागेल. तुमची कामे विचारपूर्वक करा, खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामानाच्या प्रतिकूल परिणामांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतात. आज तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते.

भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- लाल

(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:

( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस करिअरमध्ये चांगले यश मिळण्याचा दिवस आहे. मानसिक चिंता टाळा, ध्यान आणि योगासने करा. मीन राशीचे लोक तुमच्या बुद्धी आणि विवेकाने तुम्हाला हवे ते साध्य कराल. परंतु तुम्ही कोणाचीही दिशाभूल करू नका, इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन कोणतेही काम केल्यास नुकसान होईल. व्यवसायातही, आज तुम्ही कोणताही करार अंतिम केला असेल तर ते विचारपूर्वक करा. आज एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा बेत होईल. आज तुमचा कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. असे झाले तर बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.

भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- पिवळा

राशी भविष्य २७ सप्टेंबर २०२४ मराठीतून