Wayanad Landslides Update : वायनाड दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 250 हून अधिक, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Wayanad Landslides वायनाड भूस्खलन

केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या दरम्यान झालेल्या भूस्खलनात मृत्यूचा आकडा आता वाढला आहे. केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्ती घडली आहे, राज्यातील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 250 मृत्यू आला आहे, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू आहेत. अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, बचाव पथकाचे काम युद्ध वेगाने सुरू असले तरी मुसळधार पावसामुळे मोहिमेतअडथळे येत आहेत. अनेक कुटुंबातील सदस्यांनी नोंदवले आहे की त्यांचे प्रियजन अजून सापडलेले नाहीत.आतापर्यंत ३ हजार लोकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अडकलेल्या संशयित लोकांचा शोध घेण्यासाठी विविध बचाव यंत्रणां कार्यरत आहेत.याशिवाय येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी लष्कराकडून कोझिकोड येथे नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.

ARMY, NAVY आणि NDRF समावेश असलेले बचाव पथक एकत्रितपणे या दुर्घटनेत अडकलेल्या बाधितांचा शोध घेत आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी अनेक एजन्सी एकत्रितपणे काम करत आहेत. आपल्या आप्तांना शोधण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करीत आहेत.कन्नूरमधील डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) केंद्रातील २०० सैनिक, वैद्यकीय पथके भूस्खलनाच्या घटनेत मदत करण्यासाठ तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीला देखील हातभार लावत आहेत. या दुर्घटनास्थळी असलेला पूल कोसळल्यानं आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात काहीसे अडथळे येत आहेत.दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आलंय. लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाची पुनर्बांधणी करत आहेत. या पुलामुळे बचावकार्य जलद करता येईल. चुरलमळा ते मुंडक्काईला जोडणारा हा १९० फूट पूल पूर्ण होऊ शकतो.

Wayanad Landslide

   भूस्खलनात आता पर्यंत 98 नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले आहे.सीएम कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की मेप्पाडीत 90 तर निलांबुर येथे 32 लोक ठार झाले आहेत. अनेक रुग्णालयात 192 जखमींवर उपचार सुरु आहेत. मेप्पाडीच्या चहाच्या मळ्यात किती लोक राहात होते याची काहीही माहिती प्रशासनाकडे नव्हती. येथे अनेक बाहेरुन आलेल्या राज्यातील मजूर रहात होते. दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही पर्यटकही अडकले असल्याचा अंदाज आहे.

Kerala Wayanad Landslide केरळ वायनाड भूस्खलन 

30 जुलै मंगळवारच्या मध्यरात्री केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टी मुळे पहाटे १ ते 3 च्या दरम्यान भूस्खलन झाल्याने डोंगराच्या खाली असलेल्या चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई या चार गावां मोठे नुकसान झाले आहे. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला.मेपड्डी येथे रात्री दोनच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यानंतर पहाटे ४.१० वाजता पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय १७ आणि एलएच ही हेलिकॉप्टर सुलूरला पाठवण्यात आली आहेत. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे की, वायनाडमध्ये 45 छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यात 3,000 हून अधिक विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनी बचाव कार्यावर भर दिला आणि विस्थापितांसाठी घर भाड्याच्या तरतुदींचे आवाहन केले.

Kerala Wayanad Landslide

मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांना भूस्खलनाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावांमधील शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. एकट्या चुरलमाला येथेच 300 अधिक घरांचे नुकसान झाल्याचे समजते. या भूस्खलनाचा सर्वाधिक फटका हा चुरलमालाला बसला आहे. येथे घरांच्या बाहेर असलेली वाहने, दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मनोरमा न्यूजने स्थानिक लोकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अट्टामाला मधील लोकांना नदीमध्ये 6 मृतदेह वाहतांना आढळून आले आहेत.

या घटनेनंतर पिनाराई विजयन सरकारने आज आणि उद्या राज्यात अधिकृत शोक जाहीर केला आहे. वायनाडच्या चुरामाला येथील मशीद आणि मदरसा तात्पुरत्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहेत. हा भाग भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (PRD) वायनाड भूस्खलन मदत प्रयत्नांना मदत करण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय माध्यम नियंत्रण कक्ष उघडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शोध आणि बचाव कार्यासाठी पोलिस ड्रोन आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदतीचे आश्वासन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची माहिती घेत दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना परिस्थितीसाठी “सर्व शक्य मदत” करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

वायनाडमध्ये भूस्खलनाच्या घटनेवर पंतप्रधान यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असे पंतप्रधान म्हणाले. जखमींसाठी पंतप्रधानांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्याशीही चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी भूस्खलनात मृत झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

केंद्र सरकारने सात दिवस आधीच केरळ सरकारला अलर्ट करण्यात आले होते:

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले की, ‌‌“केरळ सरकारला आठवडाभरापूर्वीच अलर्ट करण्यात आले होते.केरळ सरकारला 23 जुलै रोजी संभाव्य भूस्खलनाबाबत आधीच इशारा देण्यात आला होता.केरळ सरकारने लोकांना वेळेत बाहेर काढले नाही.”

Kerala Wayanad

शाह म्हणाले.“या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.”“नैसर्गिक आपत्तींबाबत किमान सात दिवस अगोदर चेतावणी देणाऱ्या चार देशांपैकी भारताचा समावेश होतो.” एनडीआरएफ पथके आल्यानंतर केरळ सरकार सतर्क झाले असते तर भूस्खलनामुळे होणारे मृत्यू कमी होऊ शकले असते. “वायनाड दुर्घटनेचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार सरकार आणि केरळच्या लोकांसोबत खडकासारखे उभे आहे,”

तमिळनाडूचे काँग्रेसने सरकारने वायनाडसाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली.

वायनाड भूस्खलन आपत्तीसाठी तामिळनाडू काँग्रेस मदत निधी म्हणून 1 कोटी देणार असल्याचे तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के सेल्वापेरुन्थागई यांनी सांगितले.

श्री सेल्वापेरुन्थागाई म्हणाले, “दुर्दैवाने वायनाडमध्ये भूस्खलन झाले आहे. सुमारे 300 लोक बेपत्ता आहेत आणि बचावकार्य सुरू आहे. केंद्र सरकारने आणखी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल पाठवावे. त्यांना अधिक पैसे आणि लोकांना मदत द्यावी लागेल.. .”

तामिळनाडू काँग्रेसचे खासदार आणि आमदार वायनाडला एक महिन्याचा पगार मदत निधी म्हणून देण्याचा विचार करत आहेत.

  1. भूस्खलनाची कारणे कोणती?

    उत्तरः भूस्खलनाच्या घटना पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील थरांच्या हालचालींमुळे होतात. साधारणपणे याची चार कारणे असतात: वजन, कोन, भौगोलिक स्थिती, बाह्य बल. या सर्व कारणांमुळे जमिनीच्या अंतर्गत ताकदीवर दबाव येतो. त्यामुळे मातीची पकड सुटते आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात.

  2. भूस्खलन नेहमीच अचानक होतात का?

    उत्तरः भूस्खलन अचानक घडतेच असे नाही. कधीकधी पर्वत हळूहळू सरकतो. तो वर्षातून फक्त एक सेंटीमीटर हलू शकतो. अनेक वेळा माती अचानक आपली पकड गमावते आणि भूस्खलनामुळे क्षणार्धात विनाश होतो. केदारनाथमध्ये घडल्याप्रमाणे. त्याचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत असू शकतो

  3. वायनाडची चिन्हे आधी दिसू आली होती का?

    उत्तरः वायनाडमध्ये भूस्खलन अचानक झाले, पण त्याची चिन्हे आधीच दिसत होती. त्याचा वेग ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त असावा असा अंदाज आहे. मध्यरात्रीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे लोकांना सावरण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांना जीव गमवावा लागला.

  4. भूस्खलने कशी टाळता येतील?

    उत्तरः याला प्रतिबंध करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भूस्खलन प्रवण असलेल्या भागात बांधकाम टाळणे. बांधकाम होत असले तरी अशा भागातील पृष्ठभागावरील पाणी उतार असलेल्या भागांपासून वेगळे काढून टाकावे. अतिवृष्टी असलेल्या भागात, उताराच्या कोनाचा भार कमी केला पाहिजे. तेथे कोणतेही बांधकाम नसल्यास आणि मुख्यतः वृक्षारोपण झाल्यास हे रोखले जाऊ शकते.

  5. भूस्खलन मुख्यतः कोठे होतात?

    उत्तरः भूस्खलन सामान्यत : जेथे अस्थिर भूगर्भीय सामग्री (खडक आणि माती) असते तेथे वार होतात. प्रत्येक राज्य आणि यूएस प्रदेशात भूस्खलन होतात. ॲपलाचियन पर्वत, रॉकी पर्वत आणि पॅसिफिक कोस्टल रेंज आणि अलास्का आणि हवाईच्या काही भागांमध्ये भूस्खलनाची गंभीर समस्या आहे.